Tomato Flu | राज्यात कोरोना, मंकीपाॅक्स नंतर आता ‘टोमॅटो फ्लू’ आजाराचा धोका

मुंबई : कोरोना मंकीपाॅक्स या धोकादायक आजारांनंतर आता राज्यात पुन्हा टोमॅटो फ्लू या आजाराचा धोका वाढला आहे. हा आजार लहान मुलांमध्ये अधिक दिसून येतो. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या सूचनांचे पालन करणं आवश्यक असून केंद्राच्या आरोग्य विभागाने एक सविस्तर अहवाल जारी करून टोमॅटो फ्लूची लक्षणं आणि त्यावरचे उपचारही सांगितले आहेत.

टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य रोग आहे ज्यामध्ये शरीरावर टोमॅटोच्या रंगासारखे फोड येतात. याची बहुतेक लक्षणं व्हायरल इन्फेक्शन सारखीच आहेत. जसे की, ताप, पूरळ, सांधेदुखी, थकवा, सुजलेले सांधे, घसा खवखाने. हा विषाणू सौम्य तापा पासून सुरू होतो नंतर घसा खवखवतो आणि तापाच्या दोन-तीन दिवसांनंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ दिसू लागतात. हे पुरळ नंतर फोड्यांमध्ये बदलतात. मुख्यतः हे पूर्ण तोंडाच्या आत, जिभेवर अथवा हिरड्यांमध्ये दिसतात.

टोमॅटो फ्लू आजाराचा संसर्ग झाल्यावर काय करावंः

पाच ते सात दिवस स्वतःला सगळ्यांपासून वेगळं राहा. आजार पसरणार नाही अशी काळजी घ्या. आपण जिथे राहतो किंवा आपल्या खोलीमधील परिसर स्वच्छ ठेवा. व्हायरल झालेल्या मुलांने इतर मुलांसोबत खेळणं टाळावं. फोड्यांना हात लावू नये, जरी तुम्ही हे केलं असलं तरी लगेच हात धुवा. संक्रमित झालेल्या रुग्णांचे कपडे, भांडी वेगळी ठेवा. पुरेशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. जलद उपचारांसाठी झोप प्रभावी आहे.

श्वसन नमुन्याद्वारे सहजपणे टोमॅटो फ्लू झाला आहे की नाही हे कळू शकतं. 48 तासांच्या श्वसनाचे नमुने दिले जाऊ शकतात. हे विषाणू मल नमुन्यांद्वारे देखील शोधले जाऊ शकतात. मात्र इथेही 48 तासात नमुना देणं आवश्यक आहे. आज पर्यंत टोमॅटो फ्लू साठी स्वतंत्र औषध नाही. जे औषध व्हायरल इंफेक्शन झाल्यावर दिलं जातं, तेच औषधी या आजारासाठी देखील वापरलं जात आहे.

डेंग्यू अथवा चिकनगुनिया असू शकतो दुष्परिणामः

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेले बहुतेक प्रकरण दहा वर्षांखाली मुलांची आहेत. अशा स्थितीत सरकारला मुलांची सर्वाधिक काळजी असून या व्हायरल पासून त्यांना सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जात आहे. या फ्लू मागचं कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक अजूनही संशोधन करत आहेत. मात्र हा विषाणू संसर्गाचा एक प्रकार मानला जात असून डेंग्यू अथवा चिकनगुनियाचा हा दुष्परिणाम असू शकतो असं काहींनी सुचवलं आहे. तरी हा कोणत्या विषाणूमुळे पसरत आहे अथवा कोणत्या विषाणूंशी संबंधित आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेले नाही. जुलैपर्यंत पाच वर्षांखाली 82 मुले या विषाणूच्या वेळाख्यात आली आहेत. तर वाढत्या केसेस पाहता तामिळनाडू, कर्नाटक, सरकारही सतर्क झाली आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.