Tonsils | टॉन्सिलची सूज आणि वेदना दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Tonsils | टीम महाराष्ट्र देशा: जंक फूड, थंड पदार्थ आणि इतर संसर्गामुळे घशाला टॉन्सिलच्या समस्येला सामोरे जावे लागते. टॉन्सिल्समुळे घशात वेदना होतात आणि सूज येते. यामुळे अन्न गिळायला खूप त्रास होतो. त्यामुळे या समस्यावर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सातत्याने औषध खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. हे घरगुती उपाय केल्याने तुम्ही टॉन्सिलच्या समस्येपासून दूर राहू शकतात. टॉन्सिलच्या सूज आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

आले (Ginger-For Tonsils)

आल्यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्याचबरोबर आल्यामध्ये अँटीइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे घशाला  संसर्गापासून दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दोन ग्लास पाण्यामध्ये आल्याचा एक तुकडा दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावा लागेल. हे पाणी तुम्हाला गाळून कोमट करून प्यावे लागेल. याचे नियमित सेवन केल्याने घशाचा संसर्ग दूर होऊ शकतो.

लसूण (Garlic-For Tonsils)

टॉन्सिलच्या समस्येवर मात करण्यासाठी लसूण उपयुक्त ठरू शकतो. लसणामध्ये अँटीइफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे टॉन्सिलच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला लसणाच्या काही पाकळ्या बारीक करून घ्याव्या लागतील. दिवसातून दोन ते तीन वेळा या लसणाच्या पेस्टचे मधासोबत सेवन केल्याने टॉन्सिलच्या वेदना कमी होऊ शकतात.

लिंबू आणि मध (Lemon and honey-For Tonsils)

लिंबू आणि मध दोन्हींमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. टॉन्सिलच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. टॉन्सिल्सवरील सूज आणि वेदना दूर करण्यासाठी तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा या पेयाचे सेवन करावे लागेल. हे पाणी प्यायल्याने घसा खवखवणे आणि सुज दोन्ही गोष्टीपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

टॉन्सिलच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील फळांचा समावेश करू शकतात.

केळी (Banana For Cholesterol Control)

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचा समावेश करू शकतात. केळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम आढळून येते, जे कोलेस्ट्रॉल आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित केळी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील सुधारू शकते. त्यामुळे आहारात केळीचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

अननस (Pineapple For Cholesterol Control)

अननसामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. त्याचबरोबर अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे तत्व आढळून येते, जे कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. अननसाचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता देखील कमी होते. अननसाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या