क्रिकेटमधील ‘हे’ अतरंगी नियम जे तुम्हाला बिलकूल माहित नसतील!

– सचिन आमुणेकर 

भारत म्हणजे क्रिकेटवेडा देश! असा देश जेथे प्रत्येक घरातील मुलगा वयाच्या १५ व्या वर्षीपर्यंत क्रिकेटर व्हायची स्वप्ने पाहतो. इथे लहानातल्या लहान मुलाला क्रिकेटबद्दल इत्यंभूत माहिती असते. मोठ्यांबद्दल तर विचारायलाच नको. भले करियर कोणतही असो, पण आजही भारताची मॅच चालू असताना हमखास टीव्ही समोर जाऊन बसणार आणि मॅच संपल्यावरच उठणार.
याच डेडिकेशन मुळे त्यांना देखील क्रिकेट मधील खडानखडा माहिती असते. तरीही काही नियम असे असतात जे क्रिकेट चाहत्यांना माहित नसतात. चला तर मग जाणून घेउन क्रिकेट जगतातले असे अतरंगी नियम जे तुम्ही आजवर कधीही ऐकले नसतील..!

१) टाईम आउट.
विकेट पडल्यावर जर पुढचा बॅट्समन तीन मिनिटांच्या आत आला नाही, तर विरोधी टीमच्या अपीलनुसार अम्पायर त्या बॅट्समनला आउट ठरवू शकतात.या रुलशी निगडीत एक प्रसंग सचिन तेंडूलकरसोबत घडला होता, परंतु त्याला आउट देण्यात आले नाही, कारण कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सचिन हा १८ मिनिटांसाठी फिल्डवर नव्हता, क्रिकेट मधील आणखी एका नियमानुसार जर एखादा फिल्डर ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिल्डच्या बाहेर गेला तर जेवढ्या वेळासाठी तो फिल्डच्या बाहेर आहे तेवढ्या वेळासाठी तो बॅटिंग वा बॉलींग करू शकत नाही. ही गोष्ट सचिनच्या बरोबर लक्षात होती, परंतु इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आली नाही आणि चौथ्यादिवशी सामना सुरु झाल्यावर अवघ्या १३ मिनिटांमध्ये भारताचे २ विकेट्स गेले. आदल्या दिवशी सचिन १८ मिनिटांसाठी फिल्ड बाहेर होता, त्यामुळे त्यालाअजून ५ मिनिटे फिल्ड बाहेर राहणे भाग होते. सर्वजण सचिन कधी बॅटिंगला जातो याची वाट पाहत राहिले. परंतु सचिन काही बॅटिंगला आला नाही अखेर सौरव गांगुलीच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तो त्वरेने तयार झाला आणि स्वत: बॅटिंगसाठी उतरला. दक्षिण आफ्रीकेचा कॅप्टन स्मिथचे येथे कौतुक करायला हवे, त्याने जर अम्पायरकडे अपील केले असते तर कदाचित सचिनच्या नंतर आलेला गांगुली टाईम आउट नियमाप्रमाणे बाद आहे असे अपील तो करू शकला असता पण त्याने तसे केले नाही. हा संपूर्ण प्रसंग तुम्ही या व्हीडियोमध्ये पाहू शकता.

Loading...

2)लॉस्ट बॉल.
जर मॅच खेळताना बॉल हरवला तर फिल्डिंग करणारी टीम अम्पायरकडे लॉस्ट बॉलची आपली करू शकते. या अपीलनुसार अम्पायर तो बॉल ‘डेड बॉल’ घोषित करू शकतो.

३) हेल्मेट कनेक्शन.
जर कॅच पकडते वेळी बॉल फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूच्या कोणत्याही प्रोटेक्टिव वस्तूला (हेल्मेट, पॅड, एल्बो गार्ड, कॅप) स्पर्श करून गेली आणि त्या नंतर त्याने कॅच घेतली तर बॅट्समनला आउट दिले जात नाही.

४) अम्पायरची परवानगी न घेता बाहेर गेलात तर ५ रन्स एक्सट्रा.
जखमी झाल्यावर एखादा फिल्डर जर अम्पायरची परवागनी घेतल्याशिवाय फिल्डच्या बाहेर गेला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्सट्रा ५ रन्स मिळतात.

५) एकापेक्षा जास्त वेळ बॉल मारण्याचा प्रयत्न न करणे
बॉलरने टाकलेला चेंडू बॅट्समनने मुद्दामहून एकाच वेळेस दोनदा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला आउट दिले जाते.

6) स्पायडर कॅम आणि बॉल कनेक्शन.
जर बॅट्समनने मारलेला चेंडू फिल्डवर घिरट्या घालणाऱ्या स्पायडर कॅमेराला जाऊन आदळला तर तो डेड बॉल घोषित करण्यात येतो, त्यावर बॅट्समनला रन्स मिळत नाहीत किंवा जर मैदानाला छत असेल आणि त्यावर जाऊन जरी चेंडू आदळला तर त्यावरही बॅट्समनला रन्स मिळत नाहीत तो बॉल ‘डेड बॉल’ घोषित केला जातो.

7) हेल्मेट मिळवून देणार रन्स.
शॉट मारल्यावर जर बॉल विकेटीकीपरने फिल्डवर ठेवलेल्या हेल्मेटला जाऊन आदळला तर बॅटिंग टीमला ५ रन्स एक्सट्रा मिळतात.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.