पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; मराठवाडा मात्र कोरडाच

गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सांगली कोल्हापूरातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. विदर्भातील नागपूर विभागातदेखील कोरडाच आहे. अमरावतीमध्ये अवघा 18 टक्के पाणीसाठा आहे. कोकण, पुणे आणि नाशिक वगळता राज्यातील अनेक मोठ्या धरणांत अजूनही क्षमतेच्या निम्माही पाणीसाठा झालेला नाही. यामुळे येथी बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

मान्सून सुरू होऊन दोन महिने झाले आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भातील धरणात अजूनही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. राज्याच्या दुसऱ्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ घातला आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांतच मान्सूनची सरासरी पार केली आहे.

पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वांत मोठे असलेले उजनी धरण (117.47 टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पंढरपुरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. मात्र मराठवाडा कोरडाच आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.