भाजपचा ‘हा’ उमेदवार जिंकला फक्त 181 मतांनी

ंच्या लाटेत विरोधी पक्षांचा पराभव झाला असताना भाजपचे काही उमेदवार पाच लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र, भाजपचा एक उमेदवार असा आहे की, जो फक्त 181 मतांनी जिंकला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भोलानाथ यांना 488397 मते मिळाली. तर बसपा उमेदवार त्रिभुवन राम यांच्या पारड्यात 488216 मते पडली.

उत्तर प्रदेशातील मछली शहर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार भोलानाथ आणि बसपाचे उमेवार त्रिभुवन राम यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. काल मतमोजणी सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत जसजशी आकडेवारी समोर येईल, तसतशी या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. अखेर भाजपच्या भोलानाथ यांनी आघाडी घेत 181 मतांनी त्रिभुवन राम यांचा पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.