Toyota Car | टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर CNG व्हेरियंटमध्ये लाँच, जाणून घ्या सविस्तर

Toyota Car | टीम महाराष्ट्र देशा: ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) नेहमी आकर्षक फीचर्ससह बाजारामध्ये गाड्या लाँच करत असते. त्यामुळे कंपनीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कंपनीने त्यांच्या टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर (Toyota Urban Cruiser Hyrider) च्या सीएनजी (CNG) प्रकाराच्या किमती जाहीर केल्या आहेत. या गाड्या दोन पर्यायसह बाजारात  उपलब्ध होणार आहेत. यामध्ये S आणि G यांचा समावेश आहे. यांच्या किमती अनुक्रमे 13.23 लाख (एक्स-शोरुम) आणि 15.29 लाख (एक्स-शोरुम) आहे. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये कारच्या लाँच वेळी सीएनजी प्रकारची घोषणा केली होती.

टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर सीएनजी व्हेरियंटमध्ये 1.5L K-सिरीज इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे. या गाडीच्या मायलेजबद्दल सांगायचे झाले, तर ही SUV सीएनजी प्रकारात 26.6 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

या गाडीच्या डिझाईन आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर ही गाडी सध्याच्या पेट्रोल मॉडेल सारखीच आहे. या गाडीच्या सीएनजी आवृत्तीमध्ये मागच्या बाजूला फॅक्टरी-फिट केलेले सीएनजी किट मिळेल. त्यामुळे कारचा बूट स्पेस थोडा कमी झाला आहे. या गाडीच्या दोन्ही सीएनजी प्रकारामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या Kia Seltos, Hyundai Creta या सीएनजी कारसोबत स्पर्धा करेल. टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर आणि मारुती ग्रँड विटारा सीएनजी समान प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या आहेत. मारुतीने आधीच ग्रँड विटाराचे सीएनजी व्हेरियंट बाजारामध्ये लाँच केले आहे.

महत्वाच्या बातम्या