Toyota Innova Hycross | टोयोटाने सादर केली नवीन ‘इनोव्हा हायक्रॉस’ MPV कार, जाणून घ्या फीचर्स

Toyota Innova Hycross | टीम महाराष्ट्र देशा: टोयोटा (Toyota) अलीकडेच भारतीय बाजारपेठेतील पहिली हायब्रीड कार लाँच केली आहे. कंपनीने आपली अपडेटेड एमपीव्ही (MPV) टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) लाँच केली आहे. ही कार 7 आणि 8 सीट या दोन पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे.

डिजाइन

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार बॉडी-ऑन-फ्रेम चेसेसवर तयार करण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये मस्क्युलर क्लॅमशेल बोनेट, डेटाइम रनिंग लाइट्ससह स्लीक एलईडी हेडलाइट्स, क्रोमसह हेक्सागोनल ग्रिल, रुंद एअर डॅम, सिल्व्हर स्किड प्लेट्स, साइड ORVM, क्रोम विंडो गार्निश, 18-इंच डिझायनर अलॉय व्हील देण्यात आले आहे.

इंजिन

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहे. यामध्ये डायरेक्ट शिफ्ट CVT गिअरबॉक्स, 2.0L इनलाईट-फोर, TNGA पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. त्याचबरोबर E-CVT गिअरबॉक्ससह फर्स्ट-इन-सेगमेंट 2.0L TNGA पेट्रोल हायब्रीड सेटअपसह दुसरे इंजिन उपलब्ध आहे. हे 186 कलाम पॉवर आणि 187Nm टार्क जनरेट करू शकते.

फिचर्स

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या कारमध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड, लेदर अपहोल्स्ट्रीसह प्रशस्त केबिन, इंटिग्रेटेड लाइटिंगसह पॅनोरामिक सनरूफ, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, मल्टी-फंक्शनल स्टिअरिंग व्हीलसह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी वैशिष्ट्य देण्यात आले आहे.

किंमत

या गाडीच्या बेस G7S मॉडेलची सुरुवातीची किंमत 18.30 लाख रुपये आहे. तर या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 28.97 लाख रुपयापर्यंत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.