दुख:द – भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन

दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे बलबीर सिंग सीनियर यांचं निधन झालं आहे. बलबीर सिंग 95 वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते विविध प्रकारच्या आजारांशी दोन हात करत होते.

गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना न्यूमोनियावर तब्बल १०८ दिवस उपचार घेतल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर बलबीर सिंग यांना ८ मे रोजी मोहलीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा तयार

बलबीर सिंग यांचा जन्म 31 डिसेंबर 1923 रोजी पंजाबच्या हरिपूर खालसामध्ये झाला होता. बलबीर सिंग सीनियर यांच्या कुटुंबात त्यांची मुलगी सुशबीर आणि 3 मुलं कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.