दुःखद घटना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी परिवारातील एका सदस्यानं सोशल मीडियावर शेअर करुन दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दासगुप्ता हे गेल्या काही दिवसांपासून एका दुर्धर आजारानं त्रस्त होते.

बुद्धदेव यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘बुद्धदेव यांच्या जाण्यामुळे मला अती दु;ख झाले आहे. त्यांनी आपल्या चित्रपटाच्या भाषेतून मानवी मुल्यांवर प्रभावी भाष्य केले होते. त्यांनी सिनेमाची परिभाषा बदलून प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. अशा महान दिग्दर्शकाला भावपूर्ण श्रध्दांजली.’

दासगुप्ता यांच्या पाच चित्रपटांना बेस्ट फिचर फिल्मचा नॅशनल अॅवॉर्ड मिळाला आहे. याशिवाय त्यांच्या दोन चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट डिरेक्टरच्या नॅशनल अॅवॉर्डनही सन्मानित करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा