InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आता फक्त 3 दिवसांत पोर्ट होणार मोबाईल नंबर

मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी आता एक आठवडा थांबण्याची गरज नाही.TRAI च्या नियमांनुसार ही प्रक्रिया पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. आता फक्त तीन दिवसांत ही प्रक्रिया होणार आहे. MNP च्या नियमांनुसार ग्राहक आपला नंबर बदलल्याशिवाय एका ऑपरेटरकडून दुसऱ्या ऑपरेटरकडे पोर्ट करू शकतो.

या सगळ्या बदलाला आता फक्त तीन दिवसांचा वेळ लागणार आहे. या अगोदर सगळ्या प्रक्रियेला सात दिवस लागत असतं. नवीन नियमांनुसार पोस्टपेड कस्टमर्सला आपला मोबाईल नंबर पोर्ट करण्याअगोदर त्या कंपनीचं सगळ बिल भरणं अनिवार्य आहे. पोस्टपेडची पूर्ण रक्कम भरल्यावरच नंबर पोर्ट करण्यासाठी स्विकारला जातो.

Loading...

नवीन नियमांनुसार आता ग्राहकांना फक्त कामाच्या तीन दिवसांत आपलं मोबाईल क्रमांक पोर्टकरून मिळेल. तसेच कोणत्याही कंपनीत नंबर पोर्ट करण्यासाठी युझरचे ते कनेक्शन कमीत कमी 90 दिवस पूर्ण केलेले असावे.

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.