स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बळी’चा ट्रेलर प्रदर्शित!

मुंबई : मराठी अभिनेता स्वप्नील जोशी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. स्वप्नील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय पाहायला मिळतो. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वप्नीलने त्याचा आगामी चित्रपट ‘बळी’चं पोस्टर शेअर केलं होतं. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

स्वप्नीलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये कोण आहे एलिझाबेथ..? हे गूढ रहस्य उलगडणार आहे. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरियाने केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा