मोठी बातमी : कोल्हापूरमधील रेल्वे स्टेशनवरील रेल्वेला आग; एक डबा जळून खाक

कोल्हापूर : कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशनवरील सर्व्हिसिंग वर्कशॉप येथे रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग लागली होती. काल रात्रीच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमनचे तीन बंब तसेच, जीवन रक्षक आपात्कालीन सेवा संस्थेचे जवान आदींच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

आगीमध्ये रेल्वेचा एक डबा जळून खाक झाला आहे. ही आग अचानक लागली असून याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रेल्वे पोलिस प्रशासन घडल्या प्रकाराची चौकशी करत आहे.

कोल्हापूर मधील रेल्वे स्थानकात धुराचे लोट दिसू लागले अन् पाहता पाहता आगीच्या मोठ्या ज्वालांनी आसमंत व्यापला. काही मिनिटांतच रेल्वेचा डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. स्थानक परिसरात धूर आणि आगीच्या तांडवाने स्थानकात उपस्थित रेल्वेचे कर्मचारी आणि प्रवासी हबकून गेले.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा