InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तहानलेल्या चेन्नईला रेल्वेने पाणी पुरवठा

तामिळनाडूची राजधानी चेन्नईला गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी संकटावर मात करण्यासाठी ५० वॅगनची रेल्वे २.५ दशलक्ष लिटर पाण्यासह वेल्लोर जिल्ह्यातील जोलरपेट रेल्वे स्टेशनपासून चेन्नईला आज (दि.१२) सकाळी रवाना करण्यात आली. दुपारपर्यंत ही रेल्वे चेन्नईतील विलीवक्कम रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झाली. लवकरच दुसरी ट्रेनही चेन्नईमध्ये पोहचेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

चेन्नई शहरातील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. शहराजवळील अनेक तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट तीव्र झाले आहे. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी वेल्लोरहून रोज १० दशलक्ष लिटर पाण्याची आवक केली जाईल अशी घोषणा एआयएडीएमकेचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी केली होती. त्यानुसार आज पाण्याची पहिली रेल्वे चेन्नईत दाखल झाली. रेल्वेच्या प्रत्येक वॅगनमधून ५५ हजार लिटर पाण्याची वाहतूक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply