परिवहन मंत्री अनिल परब ईडी चौकशीसाठी हजर राहणार ?

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. त्यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. परंतु ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये नेमक्या कोणत्या प्रकरणाची चौकशी करायची आहे याचा स्पष्टं उल्लेख नाही. मात्र अनिल परब यांना आलेल्या नोटिसीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.

आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी अनिल परब यांना बोलावण्यात आलं आहे. कोणत्या प्रकरणाशी संबंधित चौकशीला बोलावलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच काल शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित काही संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या देखील अडचणी ईडीने वाढवल्या आहेत.

दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होतं, असं सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता या पार्श्वभूमीवरच परब यांना ईडीने बोलावले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा