“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

सिंधुदुर्ग : राणे विरुद्ध शिवसेना हा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. अशातच आता सिंधुदुर्ग येथे बोलत असताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना सावंतवाडी तालुका भाजपमय करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पुढे नारायण राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

यानंतर परिवहन मंत्री हे केवळ मुख्यमंत्र्याचे कलेक्टर असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. सावंतवाडीत एसटी आगारात सुरु असलेल्या आंदोलनाला नारायण राणे यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अनिल परब यांच्यावर जोरदार टीका देखील केली आहे.

पुढे राणे यावेळी म्हणाले, एसटी महामंडळ हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र गेले पंधरा दिवस आपल्या न्याय मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतानाही राज्य सरकार त्यांना खेळवत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा