Travel Guide | कमी बजेटमध्ये ट्रीप प्लॅन करत असाल, तर भारतातील ‘या’ राज्याला द्या भेट

टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर (November) महिना येताच आपण फिरायला (Travel) जाण्याचे प्लॅन करायला लागतो. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये फिरण्यासाठी सर्वात अनुकूल वातावरण असते. अनेकदा वातावरण अनुकूल असते पण आपले बजेट अनुकूल नसल्यामुळे आपण फिरायला जाण्याचे प्लॅन कॅन्सल करत असतो. म्हणूनच आम्ही आज या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला भारतातील एका ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये ट्रिप करू शकता.

देशाची राजधानी दिल्ली ही अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिल्लीकडे पर्यटक नेहमी आकर्षित होतात. पण तुम्हाला माहिती आहे का दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा (Hariyana) राज्यामध्ये काही कशी आकर्षक ठिकाण आहे जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकतात. त्यापैकी मुख्य ठिकाण आहे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र तुम्ही महाभारतामध्ये ऐकले असेल. पण कुरुक्षेत्र या ठिकाणी तुम्ही बजेटमध्ये तुमची ट्रीप प्लॅन करू शकता.

गुजरी महाल

हिसार या ठिकाणी स्थित असलेले गुजरी महाल हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. फिरोजशाह तुघलक या मुघल बादशहाने त्याच्या प्रियकरासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. प्रेमाचे प्रतीक असलेला हा राजवाडा खूप सुंदर आणि आकर्षित आहे. त्यामुळे तुम्ही जर दिल्ली फिरायला गेला तर हिसारमधील या राजवाड्याला भेट द्यायला विसरू नका.

कर्ण तलाव

इतिहासकारांच्या मते, कुंती पुत्र कर्णाच्या नावाने या तलावाला नाव देण्यात आले आहे. या तलावामध्ये कर्ण स्नान करून ध्यान करीत असे असे देखील मान्यता आहे. सध्या कर्नल या ठिकाणी हा कर्ण तलाव आहे. या कर्ण तलावाच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळे आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

शिवकुंड

इतिहासकारांच्या मते, सोहना इथे स्थित असलेले शिवकुंड मधील शिवमंदिर पाच हजार वर्षे जुने आहे. या मंदिराच्या आजूबाजूला तलाव असून या तलावातून गरम पाणी बाहेर येते. या तलावामध्ये स्नान केल्यास तसेच संबंधित आजारांपासून मुक्ती मिळते, अशी देखील मान्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.