Travel Guide | दमण आणि दिव ट्रिप प्लॅन करत आहात?, तर ‘या’ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) येताच आपण फिरायला (Travel) जाण्याचे प्लॅन करायला लागतो. जर तुम्ही या हिवाळ्यामध्ये निसर्गाला जवळून बघण्यासाठी दमण आणि दिव बेट (Daman and Diu Island) ला फिरायला जाण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दमण आणि दिव आयलँड मधील काही सुंदर ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. कारण भारतातील बाकी बीच आणि दमण आणि दिव मधील बीच फार वेगळे आहेत. त्याचबरोबर येथे तुम्हाला पोर्तुगीज आणि गुजराती संस्कृती अनुभवायला मिळेल.

दमण आणि दिव या सुंदर बेटावर तुम्हाला सेंड फ्रान्सिस चर्च, दिवू म्युझियम, गंगेश्वर मंदिर इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये राहण्यासाठी हॉटेल्स पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर दमण आणि दिव मध्ये तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.

देवका बीच

दमणचा देवका बीच हा जगप्रसिद्ध आहे. कारण निसर्गसौंदर्याने नटलेला हा बीच जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्याचबरोबर हा समुद्रकिनारा संध्याकाळी हँग आऊट करण्यासाठी आणि शांततेत एकट्याला वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या बीचवर पोहणे अत्यंत धोकादायक मानले जाते. कारण या बीचवर खडकाळ जमीन आहे. त्यामुळे या बीचला भेट द्यायला गेल्यास पाण्यात जाणे टाळावे. पण या बीचवर एक सुंदर अम्युजमेंट पार्क आहे. जिथे तुम्ही धबधब्यासोबत कोणाचाही आनंद घेऊ शकतात.

चक्रतीर्थ

भगवान श्रीकृष्णाने जालंधर नावाच्या दैत्याचा वध या ठिकाणी केला अशी इथल्या स्थानिकांची श्रद्धा आहे. हे ठिकाण निसर्ग निसर्गसौंदर्याने नटलेले इथे आजूबाजूला सुंदर बाग आणि बॉम जीसस चे चर्च आणि दीपगृह आहे.

दिव मधील फिरण्याची (Travel) ठिकाणं

दिवच्या सौंदर्यसृष्टीबद्दल बोलायचे झाले, तर हे एक आकर्षक बीच रिसॉर्ट शहर आहे. दिव मधील घोड्याच्या पायासारखा आकार असलेले नागोबा बीच जगभर प्रसिद्ध आहे. दिवच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा हा समुद्रकिनारा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्याचबरोबर दिवमध्ये तुम्हाला अनेक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करता येतात. यामध्ये प्रामुख्याने स्विमिंग सर्विंग पारसीलिंग इत्यादींचा समावेश होतो.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.