Travel Guide | निवांत सुट्टी साजरी करण्यासाठी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही पण तुमच्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून फिरायला (Travel) जाण्याचा विचार करत आहात का? होय! तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सुट्टी (Holiday) साजरी करण्यासाठी काही निवांत आणि शांत ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी चार ते पाच दिवस निवांत साजरी करू शकतात. या ठिकाणांना भेट दिल्यावर तुम्हाला शांत आणि निवांत वाटेल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल, भारतामध्ये निवांत सुट्टी साजरी करण्यासाठी तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

गोवा

तीन ते चार दिवस सुट्टी साजरी करण्यासाठी गोवा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. गोव्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचा आनंद घेता येईल. यामध्ये पार्टी, फोटोशूट इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. गोव्यामध्ये तुम्हाला आधुनिक संस्कृती देखील बघायला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे उत्कृष्ट नजारे बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर तीन ते चार दिवस सुट्टी साजरा करण्याचा विचार करत असाल, तर गोवा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

केरळ

केरळ राज्य निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला तलाव, चहाचे मळे, सुंदर पर्वत, समुद्रकिनारे सर्व एकत्र पाहण्याचा आनंद मिळू शकतो. केरळमध्ये तुम्ही मुन्नार, कोची, अलेप्पी इत्यादी सुंदर ठिकाणी एक्सप्लोर करू शकतात. कोचीमध्ये तुम्ही हाऊसबोटचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही जर तीन ते चार दिवस सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही केरळला नक्की भेट दिली पाहिजे.

राजस्थान

राजस्थान भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक राज्य आहे. या ठिकाणी तुम्हाला किल्ले, मंदिर, राजवाडे, तलाव, हिल स्टेशन इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. राजस्थान वाळवंटासाठी देखील प्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये तुम्ही जोधपुर, उदयपूर, जैसलमेर, पुष्कर इत्यादी शहरांना भेट देऊ शकतात. तुम्ही जर तीन ते चार दिवस रोड ट्रीपची प्लॅनिंग करत असाल, तर राजस्थान तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.