Travel Guide | फेब्रुवारी महिन्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाण करा एक्सप्लोर

Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी (February) महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी सर्वोत्तम असते. कारण या महिन्यातील वातावरण जास्त उष्ण आणि जास्त थंडही नसते. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने या महिन्यात फिरायला जाण्याची तयारी करत असतात. त्याचबरोबर या महिन्यामध्ये निसर्गाचे सर्वोत्तम नजारे देखील बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही पण जर फेब्रुवारीमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

पुष्कर, राजस्थान

पुष्कर हे ठिकाण फेब्रुवारी महिन्यात भेट देण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण या महिन्यामध्ये पुष्करमधील वातावरण अतिशय आल्हाददायक असते. या ठिकाणी तुम्हाला आकर्षक तलाव, राजवाडे, मंदिर इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. पुष्करमध्ये तुम्ही तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात.

शिलॉंग

फेब्रुवारीच्या आल्हाददायक वातावरणामध्ये तुम्ही शिलॉंगला फिरायला जाण्याची योजना आखू शकतात. शिलॉंगमध्ये तुम्हाला उत्कृष्ट निसर्गाचे नजारे बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला भारतातील एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडू शकते. त्याचबरोबर शिलॉंगमध्ये तुम्ही अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकतात.

उटी, तामिळनाडू

निलगिरी डोंगर रांगेत वसलेले उटी हे दक्षिण भारतातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. फेब्रुवारी महिना या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. उटीला ‘क्वीन ऑफ हिल्स’ असे देखील म्हणतात. या ठिकाणी तुम्ही चहाचे मळे, बॉटनिकल गार्डन इत्यादी आकर्षक स्थळांना भेट देऊ शकतात.

महाबळेश्वर, महाराष्ट्र

फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील महाबळेश्वरला भेट देऊ शकतात. कारण या महिन्यात महाबळेश्वरमधील वातावरण अतिशय उत्तम असते. महाबळेश्वरमध्ये तुम्ही मेप्रो गार्डनसह अनेक आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सुंदर नजारे दिसतील.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.