Travel Guide | भारतातील ताजमहल सह ‘ही’ ठिकाणं आहेत परदेशी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण
टीम महाराष्ट्र देशा: जगातील सात आश्चर्यापैकी Seven Wonders एक असलेला ताजमहल Tajmahal पाहण्यासाठी देशासह परदेशी पर्यटक आग्र्याला गर्दी करत असतात. पण ताजमहलसह भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी बघण्यासाठी परदेशी पर्यटक आवर्जून भारताला भेट देतात. भारतातील या पर्यटन स्थळी परदेशी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देण्यासाठी येतात. भारतामध्ये नुकताच प्रसिद्ध झालेल्या पुरातत्त्व सर्वेक्षण अहवालानुसार, भारतात अशी 10 ठिकाणे आहे जिथे दरवर्षी सर्वाधिक विदेशी पर्यटक भेट देतात. आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणांमधील काही जागाबद्दल माहिती सांगणार आहोत.
तिरुमयम किल्ला
भारतातील तमिळनाडू राज्यात पुदुकोट्टाई जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या तिरुमयम शहरात हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला सुमारे 40 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. 1687 मध्ये रामनाथाचा राजा विजय रघुनाथ सेतुपती यांनी हा किल्ला बांधलेला आहे. ही भव्य ऐतिहासिक वास्तू वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तिरुमयम किल्ल्या बहुगुर युद्धातील बंडखोर सरदारांचे विशेष स्थान होते.
आग्रा किल्ला
यमुना नदी काठी वसलेला लाल दगडांचा आग्रा किल्ला हा अप्रतिम सौंदर्याचे प्रतीक आहे. मुगल सम्राट अकबर याने हा किल्ला बांधला होता. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये मुघलांचे वास्तव्य होते. आग्रा किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होतो. दरवर्षी या किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येते गर्दी करतात.
ताज महाल
मुगल सम्राट शहाजान याने आपल्या पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तु ताजमहल ही जगातील आठ आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. ताजमहल चे बांधकाम सुमारे 22 वर्षे चालले होते. ताजमहलमध्ये केलेले नक्षीकाम आणि भिंती हे कुठल्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. या वास्तूचे रेखीव काम बघण्यासाठी जगभरातील पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
ममल्लापुरम
ममल्लापुरम हे ठिकाण प्रामुख्याने महाबलीपुरम म्हणून ओळखले जाते. महाबलीपुरम हे ठिकाण चेन्नईच्या दक्षिण किनाऱ्यापासून सुमारे 56 km अंतरावर आहे. महाबलीपुरम हे एक ऐतिहासिक शहर असून येथील रॉककट मंदिरे, लेण्या, स्थापत्य शिल्प इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये महाबलीपुरमचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. एका अहवालानुसार, 2022 मध्ये महाबलीपुरमला सर्वाधिक विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs NED । भारताचा नेदरलँड्सवर 56 धावांनी दणदणीत विजय
- Raosaheb Danave | “जरा आपल्या वयानुसार…”; रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंवर हल्ला
- Ola Electric Bike | इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारनंतर Ola लवकरच लाँच करणार आहे इलेक्ट्रिक बाईक
- Virat Kohli । नेदरलँड्स विरुद्ध खेळताना विराट कोहलीचा नवा विक्रम! ख्रिस गेलला टाकले मागे
- Rohit Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.