Travel Guide | ‘या’ ठिकाणांना भेट देऊन आपल्या जोडीदारासह दिवाळीच्या सुट्ट्यांचा घ्या आनंद
टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू झालेला असून सर्वत्र सुट्ट्यांचा माहोल निर्माण झाला आहे. दिवाळी च्या सुट्टीमध्ये Diwali Holiday लोक आपल्या मित्र परिवारासह सुंदर ठिकाणी फिरायला Travel जातात. त्याचबरोबर लोक आपल्या जोडीदारासह सोबत देखील फिरायला जातात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासह फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला बेस्ट कपल डेस्टिनेशन सांगणार आहोत.
ऋषिकेश
जर तुम्हाला तुमचे नाते आणि दिवाळी दोन्हीही स्मरणीय बनवायचे असेल तर ऋषिकेश तुमच्यासाठी सर्वोत्तम डेस्टिनेशन ठरू शकते. भारताची योग कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे हे ऋषिकेश शहर एक धर्मनगरी आहे. ऋषिकेश शहरांमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासह गंगा मातेची मनोभावी पूजा करून तेथील बोटिंग आणि रिव्हर राफ्टिंग या अॅडवेंचर स्पोर्ट्स देखील आनंद घेऊ शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तेथील योगा सेंटर मध्ये जाऊन योगाचाही आनंद घेऊ शकतात.
मनाली
समुद्रसपाटीपासून 6,398फूट उंच असलेले मनाली शहर निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. व्यास नदीच्या किनारी वसलेले हे शहर दिल्लीपासून 554 किमी अंतरावर आहे. मनालीच्या सुंदर बर्फांच्या पर्वतामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत दिवाळीचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर मनाली मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कपल अॅक्टिव्हिटी देखील करू शकता.
स्पिती व्हॅली
तुम्ही जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हीच स्पिती व्हॅलीला भेट देऊ शकता. निसर्ग सौंदर्य नटलेल्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल बरोबर सर्वोत्तम स्मरणीय क्षण घालवू शकतात.
जयपूर
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात तुम्ही तुमच्या जोडीदारासह दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपुर मध्ये जाऊन तुम्ही हवा महलसह अनेक ऐतिहासिक ठिकाणी तुमच्या जोडीदारासह भेट देऊ शकता. त्याचबरोबर जयपूर शहरांमध्ये स्थित असलेले पॅलेस आणि तलाव देखील तुम्हाला सर्वोत्तम अनुभव देतील.
महत्वाच्या बातम्या
- IND vs Pak | पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा भावूक, राष्ट्रगीत गाताना अश्रू अनावर!
- Brahamastra | रणवीर आणि आलियाचा सुपरहिट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच होणार OTT रिलीज
- IND VS PAK | भारताची खराब सुरवात! पहिल्या 7 ओव्हरमध्ये 4 खेळाडू तंबूत
- IND VS PAK | शमीची अप्रतिम कामगिरी! 5 चेंडूत 4 षटकार ठोकणाऱ्या इफ्तिखारला रोखले
- T20 World Cup | 2 वेळा T20 World Cup चॅम्पियन वेस्टइंडीज झाली वर्ल्ड कप मधून बाहेर, जाणून घ्या कारण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.