Travel Guide | सुट्टी साजरी करण्यासाठी शांत जागा शोधत आहात? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
Travel Guide | टीम कृषीनामा: फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने फिरायला (Travel) जाण्यासाठी बाहेर पडतात. कारण फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी अतिशय उत्तम असते. त्यामुळे बहुतांश लोक या महिन्यात फिरायला जाण्याची योजना आखत असतात. या महिन्यामध्ये तुम्ही शांत ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.
कूर्ग
दक्षिण भारतात वसलेले कुर्ग हे शहर आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी चहाचे मळे आणि उंच पर्वत बघायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही अब्बे धबधबा, नामद्रोलिंग मठ, होन्नमना केरे तलाव, माडीकेरी किल्ला आणि तालकावेरी इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात.
राजस्थान
राजस्थान हे राज्य कला आणि संस्कृतीसाठी जगप्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. राजस्थानमध्ये तुम्ही उदयपूर, जोधपुर, जैसलमेर, पुष्कर, जयपुर इत्यादी शहरांना भेट देऊ शकतात.
मुन्नार
मुन्नार हे दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे शहर केरळ राज्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी तुम्ही इको पॉइंट, अतुकड धबधबा, एरविकुलम नॅशनल पार्क, टाटा टी म्युझियम, पल्लीवासल फॉल्स, रोझ गार्डन आणि कोलुकुमलाई टी इस्टेट इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात.
गोवा
गोवा देशातील लोकप्रिय व्हेकेशन डेस्टिनेशन आहे. आयुष्यात एकदा तरी गोव्याला भेट द्यावी, असे प्रत्येकालाच वाटत असते. गोव्यामध्ये देशासह विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. गोव्यामध्ये तुम्हाला निसर्गसौंदर्यासोबतच आकर्षक समुद्रकिनारे बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही पालोलेम बीच, दूधसागर फॉल्स, बागा बीच आणि अंजुना या ठिकाणांना भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
Comments are closed.