Travel Guide | हिवाळ्यामध्ये कुटुंबासोबत फिरण्यासाठी ‘हे’ आहेत परफेक्ट विंटर डेस्टिनेशन

टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर (November) महिना येताच आपण फिरायला (Travel) जाण्याचे प्लॅन करायला लागतो. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये फिरण्यासाठी सर्वात अनुकूल वातावरण असते. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये अनेक लोक आपल्या कुटुंबासमवेत फिरायला बाहेर पडतात. कारण भारतामधील काही ठिकाणं ही हिवाळ्यामध्येच भेट देण्यासाठी योग्य आहेत. कारण हिवाळ्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत निसर्गाची वेगळीच सावली पाहायला मिळते. तुम्ही पण तुमच्या कुटुंबासोबत या गुलाबी थंडीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला बजेट फ्रेंडली (Budget Friendly) विंटर डेस्टिनेशन (Winter Destination) बद्दल माहिती सांगणार आहोत.

बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल डेस्टिनेशन (Budget Friendly Travel Destination)

औली

भारतातील उत्तराखंड राज्यांमध्ये स्थित असलेले औली शहर एक सर्वात स्वस्त शहर आहे. औलीमध्ये तुम्हाला निसर्गसौंदर्याचा सर्वोत्तम नजरा दिसेल. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नंदादेव पार्क, औली आर्टिफिशल लेक, गोरसन बुग्याल इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही बर्फवृष्टीचा देखील आनंद घेऊ शकता. औलीमध्ये तुम्हाला ट्रेकिंग आणि स्किइंग पण करता येईन.

उदयपूर

भारतातील राजस्थान राज्यांमध्ये असलेले उदयपूर हे ठिकाण हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. त्याचबरोबर उदयपूर या शहराला तलावाचे शहर असेही म्हणतात. उदयपूर मधील राजवाडे, तलाव कधी गोष्टींचा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर शहरातील लेक पीचोला, फतेह सागर तलाव, सज्जनगड पॅलेस इत्यादी ठिकाणांना तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत भेट देऊ शकता.

कसोल

हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये स्थित असलेले कसोल या ठिकाणाचे नाव तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये ऐकले असेल. कसोल हे हिमाचल प्रदेश मधील एक छोटेसे गाव असून इथे तुम्हीला सर्व सुविधा मिळू शकतात. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चार-पाच दिवस आरामात फिरू शकता. कसोलमध्ये तुम्हाला आश्चर्यचकित करणारे निसर्गाचे नजारे दिसतील.

जयपूर

भारतातील ‘पिंक सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले जयपूर शहर देखील कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जयपूर येथे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये ट्रीप प्लॅन करू शकता. या ठिकाणी तुम्ही सिटी पॅलेस, हवा महल, बिर्ला मंदिर, अंबर किल्ला इत्यादी गोष्टींना भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.