Travel Guide | ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम Hills Station

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहे. यामध्ये आकर्षक समुद्रकिनाऱ्यांपासून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिल्स स्टेशन Hills Station पर्यंत सर्व ठिकाणांचा समावेश होतो. काही लोकांना समुद्रकिनारांना भेट द्यायला आवडते पण भारतात बहुतांश लोकांना हिल स्टेशनला जायला जास्त आवडते. कारण समुद्रकिनाऱ्यापेक्षा हिल स्टेशन वरचा अनुभव अनेकदा मोहक वाटतो. म्हणूनच आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला भारतातील काही हिल स्टेशन बद्दल माहिती सांगणार आहोत. तर तुम्ही कुठे हिल स्टेशनवर फिरायला जायचं प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

भारतातील सर्वोत्तम हिल्स स्टेशन Hills Station

शिलाँग, मेघालय

भारताच्या नॉर्थ-ईस्ट भागात वसलेले शिलॉंग शहर निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. शिलॉंग मधील लँडस्केप स्कॉटलंड सारखे आहे असे म्हटले जाते. येथील बर्फाचे पर्वत प्रामुख्याने पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचबरोबर येथील नद्या आणि धबधबे सुद्धा भेट देण्यासारखे आहेत. शिलॉंग मधली संस्कृती आणि जेवण सुद्धा खूप खास आहे.

कुर्ग, कर्नाटक

भारताच्या दक्षिण भागात कर्नाटक राज्यात घडलेले कुर्ग शहर खूप सुंदर आहे. कुर्ग मधील मंदिरे, मठ, किल्ले इत्यादी गोष्टी पर्यटकांना आपल्याकडे ओढून घेतात. त्याचबरोबर ही एक ऐतिहासिक जागा आहे. कूर्ग मध्ये ॲबे फॉल्स, ब्रह्मगिरी वाईल्ड लाईफ सेंचुरी इत्यादी गोष्टी बघण्यासारखे आहेत.

मसूरी , उत्तराखंड

भारतातील ‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हणजे मसूरी हे उत्तराखंड मध्ये वसलेले एक सुंदर शहर आहे. मसूरी मधून हिवाळ्याचे नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. त्याचबरोबर मसूरी मध्ये अनेक आकर्षक कॅफे असून इथला मॉल रोड पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतो. त्याचबरोबर मसूरी मध्ये तुम्हाला सुंदर सनसेट पॉईंट देखील सापडतील.

गंगटोक, सिक्कीम

शांतता आणि साधेपणाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारे गंगटोक शहर हे शहराच्या गजबजाटापासून दूर वसलेले आहे. गंगटोक मध्ये तुम्हाला रोपवे, माउंटन बायकिंग, ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींग, इत्यादी एडवेंचर्स गोष्टी करायला मिळतील. तुम्ही जर गंगटोकला भेट देणार असाल तर तेथील मंदिरे आणि मठांना भेट द्यायला विसरू नका.

उटी, तामिळनाडू

उटी हे भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. निसर्ग सौंदर्याने नटलेले उटी हे शहर तुम्हाला खूप चांगला अनुभव देते. त्याचबरोबर उटीमध्ये स्थित असलेले निलगिरी पर्वत हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. उटी मध्ये असलेली ब्रिटिशकालीन ट्रेन बघण्यासाठी पर्यटन आजही उटीला भेट देतात.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.