Travel Tips | आता करा मोफत फॉरेन ट्रीप, कारण ‘हा’ देश देणार आहे मोफत विमान तिकीट
टीम महाराष्ट्र देशा: आयुष्यात एकदातरी फॉरेन ट्रीप करावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण बहुदा बजेटमुळे आपण आपली फॉरेन ट्रीप कॅन्सल करतो. कारण फॉरेन ट्रिप साठी लागणारी अमाऊंट खूप जास्त आहे असे आपल्याला नेहमी वाटते. आणि त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फॉरेन ट्रीप करण्यासाठी विमानाला लागणारा खर्च आपण बराच वेळा करू शकत नाही त्यामुळे आपण फॉरेन नेहमी कॅन्सल करतो. पण तुम्हाला माहित आहे का जगात एक असा देश आहे जो मोफत विमान तिकीट देणार आहे. हाँगकाँग देश आता पर्यटकांना मोफत विमान तिकीट देणार आहे. माहितीनुसार, कोरोना नंतर हाँगकाँग देशातील पर्यटन स्थिती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आता हाँगकाँग लोकांना बोलवण्यासाठी मोफत विमान तिकीट देणार आहे. यामध्ये हॉंगकॉंग सुमारे पाच लाख मोफत तिकिटे देणार आहे. हाँगकाँग ही तिकिटे पुढील वर्षी देणार असून याची किंमत सुमारे $ 254.8 दशलक्ष असेल. तेथील उद्योगाला मदत करण्यासाठी ही तिकिटे एक रिलीफ पॅकेज म्हणून खरेदी करण्यात आलेली आहे.
कोरोना महामारीमुळे पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान
कोरोना महामारी मुळे जगात सर्वांनाच नुकसान सहन करावे लागले आहे. पण यामध्ये सर्वाधिक नुकसान हे पर्यटन क्षेत्राला झाले आहे. कारण लोकांना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. हॉंगकॉंग शहराची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते.
परंतु, आता कोरोनाचे सगळे नियम हटवल्यानंतर लोक पुन्हा फिरू लागले आहे. त्यामुळे या देशातील पर्यटन उद्योगाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. त्यामुळे हाँगकाँग आता आपल्या पर्यटकांना मोफत विमान तिकीट देणार आहे.
फॉरेन ट्रीप ला नव्याने सुरुवात
कोरोना वरील निबंध हटवल्यानंतर पर्यटक परत या देशाला भेट द्यायला लागले आहे. पर्यटन सुरू होताच लोक प्रवासाचे चांगले पर्याय शोधू लागले आहे. हॉंगकॉंग देशाचे तिकीट शोधणाऱ्यांचा संख्येत नऊ पट वाढ झाली आहे. यामध्ये असे लक्षात आले की हॉंगकॉंग देशाकडे लोकांचे आकर्षण जास्त आहे त्यामुळे इथे आता मोफत विमान तिकीट द्यायचे ठरवले आहे.
हॉंगकॉंग देशांमध्ये अजूनही निर्बंध लागू आहेत
जगात अनेक देशांमध्ये कोरोनावरील निर्बंध हटवण्यात आले असले तरी हाँगकाँग मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी तिथे अजूनही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. हॉंगकॉंग मध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लसीकरण प्रमाणपत्र सह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. हॉंगकॉंग मध्ये पोहोचल्यानंतर प्रवाशाला तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामध्येही प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी केली जाते.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे यांची मशाल काँग्रेसच्या हाती – चंद्रशेखर बावनकुळे
- Dilip Lande । मुरजी काका 100% निवडून येणार; दिलीप लांडे यांचा मोठा दावा
- Maharashtra Rain Update | राज्यात पुणे शहरासह ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
- Sachin Sawant । “नकला आणि कलाविष्कारमधील फरक…”; काँग्रेसने ट्विट केला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ
- Uddhav Thackeray । रामदास आठवलेंना मोठा धक्का!, आठवले गटातील या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.