Travel Tips | कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं

टीम महाराष्ट्र देशा: डिसेंबर (December) महिना येताच सुट्टीची चाहूल लागते. कारण बहुतांश ठिकाणी क्रिसमस आणि नववर्षामुळे शाळांना सुट्टी असते. त्यामुळे डिसेंबरमध्ये अनेक कुटुंब (Family) फिरायला (Travel) जायचा प्लॅन करत असतात. पण अनेकदा बजेटमुळे या ट्रिप (Trip) चे नियोजन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कुटुंबासह बजेटमध्ये कुठे फिरायला जाता येईल याबद्दल माहिती सांगणार आहे.

महाबळेश्वर

डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही जर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर महाबळेश्वर हे तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये एक सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते. महाबळेश्वर हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वरला फळांचे घर असे देखील म्हटले जाते. कारण महाबळेश्वरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची लागवड केली जाते. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही महाबळेश्वरला फिरायला गेला, तर तुम्हाला निसर्गाचा सर्वोत्तम नमुना तिथे बघायला मिळेल.

मुन्नार

भारताच्या दक्षिण भागात स्थित असलेले मुन्नार हे शहर कुटुंबासोबत भेट देण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे. तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही मुन्नारमध्ये बोटिंग, गोल्फ, ट्रेकिंग यासारख्या मजेदार गोष्टींचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर मुन्नार हे तुमच्यासाठी नंदनवन ठरू शकते. कारण मुन्नारमध्ये दूरपर्यंत पसरलेल्या चहाच्या शेतांमध्ये तुम्ही उत्तम फोटोग्राफी करू शकतात.

मनाली

तुम्ही जर डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबासोबत हिमवर्षाव बघण्याचा प्लॅन करत असाल, तर कमी बजेटमध्ये मनाली तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. मनालीमध्ये डिसेंबर महिन्यात फक्त पर्वतच बर्फाने झाकलेले नसतात तर तुम्हाला रास्ते, झाडे देखील बर्फाने झाकलेली दिसतील. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्ही बर्फवृष्टीचा आनंद घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही मनालीला भेट देऊ शकतात.

उटी

कुटुंबासोबत सुट्टी साजरा करण्यासाठी उटी एक उत्तम ठिकाण आहे. उटीमध्ये शहराच्या मध्यस्थानी असलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत विविध गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर येथील निलगिरी पर्वत, रोझ गार्डन, थ्रेड गार्डन इत्यादी ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.