Travel Tips | भारतातील ‘या’ ठिकाणी तुम्ही करू शकता फ्री मुक्काम

टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला प्रवास (Travel) करायला आवडतो. मुख्यतः हिवाळ्यामध्ये पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात. कारण हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले असते. पण अनेकदा प्रवासामध्ये असताना मुक्काम कुठे करायचा? हा प्रश्न आपल्यासमोर उद्भवत असतो. तर काही वेळा मुक्कामाला जास्त पैसे लागतील या विचाराने आपण आपल्या प्रवासाचे नियोजन रद्द करतो. पण तुम्हाला माहित आहे का? भारतामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही मोफत (Free) मुक्काम करू शकता. त्याच ठिकाणांबद्दल आम्ही तुम्हाला आज या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

ऋषिकेश

उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश हे ठिकाण पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. भारताची योग कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश शहर पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. कारण येथील निसर्ग सौंदर्याचे नजारे आणि संध्याकाळी होणारी गंगा आरती एक अविस्मरणीय अनुभव देते. जर तुम्ही ऋषिकेश ला फिरायला गेलास तर ऋषिकेश मधील ‘गीता भवन’ येथे तुम्ही मोफत मुक्काम करू शकता.

केरळ

जर तुम्ही केरळला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही केरळ मधील ‘आनंद आश्रम‘ येथे फ्री मध्ये मुक्काम करू शकता. आनंद आश्रम हे हिवराईच्या मधोमध स्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जेवणही चांगले मिळते.

हरिद्वार

हरिद्वार मधील जगप्रसिद्ध गंगा आरती पाहण्यासाठी तुम्ही जर हरिद्वारला जाण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही हरिद्वार येथील ‘शांती कुंज’ या ठिकाणी तुमची मोफत राहण्याची सोय होऊ शकते.

उत्तराखंड

उत्तराखंड मधील बर्फवृष्टी बघण्यासाठी तुम्ही जर उत्तराखंड ला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही उत्तराखंड मधील ‘हेमकुंड साहेब गुरुद्वारा’ येथे मोफत राहू शकता. कारण कधी कधी गर्दीमुळे उत्तराखंड मध्ये हॉटेल्स मिळत नाही त्यामुळे हेमकुंड साहेब गुरुद्वारा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मोफत खाण्यापण्याची सुविधाही उपलब्ध होऊ शकते.

टीप : भारतामध्ये कुठेही विनामूल्य राहण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.