Travel Tips | भारतातील ‘या’ ठिकाणी तुम्ही घेऊ शकता अविस्मरणीय Snow Fall अनुभव

टीम महाराष्ट्र देशा: नोव्हेंबर (November) महिन्यातील वातावरण हे फिरण्यासाठी (Travel) उत्तम वातावरण असते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पर्यटक फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधायला लागतात. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लोक हिल स्टेशनला भेट देतात कारण या महिन्यातील स्टेशनला भेट देण्याची मजा वेगळीच असते. नोव्हेंबर महिन्यातील विशेष आकर्षण म्हणजे भारतातील विविध ठिकाणी होणारी बर्फवृष्टी (Snow Fall) पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. मनाली, शिमला, श्रीनगर इत्यादी ठिकाणी पर्यटक भरपूर गोष्टी बघण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला जर शांततेत बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील काही सुंदर आणि आकर्षक त्याचबरोबर शांत बर्फसृष्टीचा आनंद घेता येणाऱ्या ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

चोपटा

चोपटा या ठिकाणाला भारतातील मिनी स्विझर्लंड म्हणून ओळखतात. भारतातील उत्तराखंड राज्यात रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये चोपटा हे ठिकाण स्थित आहे. चोपट्याला भेट देण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे गर्दी करतात. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 8556 फूट एवढ्या उंचीवर आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्ग सौंदर्याबरोबरच जगातील सर्वात उंच शिवमंदिर बघायला मिळेल.

गुलमर्ग

काश्मीरला पृथ्वीवरचे स्वर्ग म्हटले जाते. कारण काश्मीर ही भूमी हिमालय पर्वतरांगासह निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. काश्मीरमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहे. त्यामध्ये एक गुलमर्ग. हिवाळ्यामध्ये गुलमर्गचे निसर्ग सौंदर्य बघण्यासारखे असते. नोव्हेंबर महिन्यात बर्फवृष्टीमुळे गुलमर्गच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. गुलबर्ग मध्ये तुम्ही सर्वोत्तम बर्फृष्टीचा आनंद घेऊ शकता.

नारकंडा

हिमाचल प्रदेश मध्ये शिमला शहर आपल्या सगळ्यांचेच ओळखीचे आहे. कारण शिमल्याला दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत असतात. पण तुम्हाला जर शांत ठिकाणी बर्फ वृष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही शिमला पासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारकंडा या ठिकाणी जाऊन तो घेऊ शकता. नारकंडा हे ठिकाण हिमवर्षासाठीच ओळखले जाते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.