Travel Tips | भारतात ‘या’ ठिकाणी होऊ शकते तुमची बजेट ट्रीप

टीम महाराष्ट्र देशा: फिरायला (Travel) जाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण सुट्ट्यांची वाट बघत असतात. आणि आता लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे फिरायचा कुठे जायचे याचे प्लॅन्स आता सगळीकडे सुरू असेल. पण बहुदा बजेटमुळे आपण आपल्या फिरायला जायचे प्लॅन कॅन्सल करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का भारतामध्ये अशी काही पर्यटन ठिकाण आहे जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये मस्त ट्रिप करू शकता. आज आम्ही तुम्हाला याच भारतातील बजेट फ्रेंडली ट्रिप बद्दल माहिती सांगणार आहोत.

भारतातील बजेट फ्रेंडली ट्रिप (Travel) लोकेशन

हम्पी

कर्नाटक राज्यात स्थित असलेले हम्पी हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही. हम्पी चा इतिहास  पर्यटकांना  आकर्षित करतो. त्याचबरोबर हम्पी हे ठिकाण खूप स्वस्त असून तुम्ही इथे कमी बजेटमध्ये उत्तम ट्रीप करू शकता.

गोवा

आकर्षक समुद्रकिनाऱ्यांनी सुसज्ज असलेले गोवा हे ठिकाण नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरले आहे. गोव्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही इथे कोणत्याही ऋतूत गेला तरी तुम्हाला चांगलाच अनुभव मिळेल. भारतातील गोवा हे ठिकाण बजेट फ्रेंडली ट्रिप साठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. गोव्यामध्ये तुम्हाला राहण्यापासून खाण्यापर्यंत सर्व गोष्टी एकदम स्वस्त दरात उपलब्ध होतील.

कसोल

भारतातील हिमाचल प्रदेश राज्यात उत्तरेकडे कसोल हे गाव स्थित आहे. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेले कसोल शहर ट्रेकरसाठी स्वर्ग म्हटले जाते. कसोल मधली दृश्य बघून तुम्हाला खरोखरच स्वर्गात आल्यासारखे वाटू लागते. कसोल मध्ये देखील तुम्हाला खाण्यापासून राहण्यापर्यंत सर्व गोष्टी अगदी स्वस्त दरात उपलब्ध होतात.

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीला ‘द इंडियन रिव्हिएरा’ म्हणून ओळखले जाते. कारण पांडेचेरी हे ठिकाण फ्रान्स या ठिकाणाची मिळते जुळते होते आहे. कारण 1954 पर्यंत पुद्दुचेरीवर फ्रान्स देशाचे होते. हे ठिकाण एक आकर्षक ठिकाण असून येथे तुम्हाला स्वस्त दरात सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील.

ऋषिकेश

उत्तराखंड मध्ये स्थित असलेले ऋषिकेश हे ठिकाण योग राजधानी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. ऋषिकेश मधील एडवेंचर्स खेळ तरुणांना खूप आकर्षित करतात. येथील एडवेंचर गेम बरोबर इथे खाण्यापासून फिरण्यापर्यंतच्या गोष्टी तुम्हाला खूप स्वस्त दरात उपलब्ध होतात. त्यामुळे पर्यटकांचा कल ऋषिकेश कडे जास्त ओढला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.