Trek in India | ‘हे’ आहेत भारतातील सर्वोत्तम ट्रेकिंग पॉईंट्स

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. परिणामी देशातील अनेक पर्यटन स्थळी पर्यटक गर्दी करत आहे. कारण हिवाळा हा पर्यटकांना फिरण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. त्याचबरोबर ट्रेक (Trek) करणाऱ्यांसाठी हिवाळा (Winter) मध्ये अनुकूल वातावरण (Weather) असते. त्याचबरोबर आजकाल ट्रेकिंग (Trekking) चे ट्रेंड वाढत चालले आहे.  कारण ट्रेकिंग दरम्यान तुम्हाला अद्भुत अनुभव येतात.

भारतामध्ये हिमालय पर्वत आणि सह्याद्री पर्वतरांगेच्या रूपात अनेक ट्रेकिंग पर्याय उपलब्ध आहे. आजकालच्या युवा पिढीला आपल्या मित्रांबरोबर निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगचा आनंद घेत वेळ घालवायला आवडतो. जर तुम्ही ही ट्रेकिंग प्रेमी असाल आणि ट्रेकिंगसाठी नवीन जागा शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील काही सर्वोत्तम ट्रेकिंग स्पॉट बद्दल माहिती सांगणार आहोत. जिथे तुम्ही अविस्मरणीय अनुभव घेऊ शकतो.

भारतातील सर्वोत्तम ट्रेक पॉइंट (Trek Point)

काश्मीर ग्रेट लेक्स ट्रेक

काश्मीर ग्रेट फ्लेक्स ट्रेक म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गाचा अनुभव घेण्यासारखे आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला अनेक निसर्गाच्या छटा बघायला मिळतील. त्याचबाबरोबर तुम्हाला काश्मीरमधील सौंदर्य सृष्टीच्या छटा दिसतील. आणि पांढऱ्याशुभ्र हिमालयाचा सुंदर नजराना दिसेल.

गोमुख तपोवन ट्रेक

भारतातील उत्तराखंड राज्यांमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गोमुख तपोवन ट्रेक हा एक ट्रेकिंग प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. गोमुख तपोवन ट्रेकमध्ये भव्य शिवलिंग पर्वताचे शिखर आहे. हिमालय पर्वतरांगेचा आनंद लुटण्यासाठी गोमुख तपोवन हा एक उत्तम ट्रेक आहे.

व्हॅली ऑफ फ्लॉवर ट्रेक

भारतातील उत्तराखंड राज्यांमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर ट्रेक आहे. या ट्रेक मध्ये तुम्हाला सर्वोत्तम फुलाने आच्छादलेले नजारे दिसतील. व्हॅली ऑफ फ्लॉवर या ट्रेक साठी जगभरातील ट्रेकर्स येथे येतात. व्हॅली ऑफ फ्लावरमध्ये असलेले निसर्ग सौंदर्य आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव देते.

व्यास कुंड ट्रेक

भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील मनालीमध्ये भव्य व्यास कुंड ट्रेक आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला सुंदर तलाव आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेली नैसर्गिक दृश्य अविस्मरणीय अनुभव देतील.

किन्नर कैलास ट्रेक

किन्नर कैलास ट्रेक हा भारत आणि तिबेटच्या सीमेवर पसरलेला ट्रेक आहे. या ट्रेक दरम्यान तुम्हाला हजारो वर्ष जुनी बौद्ध संस्कृती जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे ट्रेकिंग प्रेमी आणि इतिहास प्रेमी लोकांसाठी किन्नर कैलास ट्रेक हा एक सर्वोत्तम ट्रेकिंग पर्याय आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.