InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

trending

…तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते- शिवसेना

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर हे हैदराबादचे ओवेसी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी निर्माण करून निवडणुकीत उतरले, पण सात-आठ मतदारसंघ वगळता त्यांना मतदान झाले नाही. संभाजीनगरात वंचित आघाडीच्या इम्तियाज जलील यांचा विजय हा अपघात आहे.आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मतदारसंघात हिंदू मतांमध्ये फूट पाडून लाखभर मते वळवली. हे घडले नसते तर संभाजीनगरवर हिरवे फडके कधीच फडकले नसते. महाराष्ट्रातून, खास करून संभाजीनगरातून ‘ओवेसी’ यांच्या पक्षाचा खासदार निवडून जावा हे दुर्दैव आहे.संपूर्ण देशात हिंदुत्वाची लाट…
Read More...

राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित

वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषितमुंबई-  राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.…
Read More...

लोकसभा निवडणुकीतील पराभवास राहुल गांधी जबाबदार नाहीत- अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्विकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी या पराभवास ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतलेले आहेत, ते कुठेही कमी पडलेले नाहीत. पण ज्या-ज्या राज्यात काँग्रेसची…
Read More...

राज्यात ९ महापालिका, २२ नगरपरिषदांसह ७ जिल्हा परिषद-१६ पंचायत समित्यांची २३ जूनला

मुंबई- राज्यात २३ जून २०१९ ला ९ महानगरपालिका, २२ नगरपरिषद, ७ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समितीची पोटनिवडणूक होणार आहे. याच दिवशी (दि. २३) नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षाचीही पोटनिवडणुकीद्वारे निवड होईल. या सर्व निवडणुकांचे निकाल २४ जून २०१९ घोषित होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.नवनिर्मित बुटीबोरी नगरपरिषदेची होणार सार्वत्रिक निवडणूकमहानगरपालिकापोटनिवडणूक…
Read More...

मोठी बातमी- पराभवानंतर राहुल गांधींनी दिला राजीनाम्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या पराभवानंतर अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याची प्रस्ताव दिल्याचे बोलून दाखवले आहे.2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील काँग्रेसने केवळ 44 जागांवर विजय मिळवला होता. आता मोदी सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केल्यानंतर देखील काँग्रेसला लोकसभेच्या 542…
Read More...

प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदार संघात विजयापासून वंचित

प्रकाश आंबेडकर यांच्या विजया संदर्भातील एक्झिट पोल खरा ठरला आहे. प्रकाश आंबेडकर याचच दोन्ही मतदार संघातून दारूण परभव झाला आहे.प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुर आणि आकोला लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र दोन्ही मतदार संघातून त्यांचा पराभव झाला आहे.सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकर यांची कॉंग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे जयसिधेश्वर महाराज यांच्च्यात लढत झाली. या लढतीत प्रकाश आंबेडकर यांचा दारूण परभव झाला आहे.तसेच आकोला लोकसभा…
Read More...

राज्यात काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत अशोक चव्हाण राजीनामा देणार?

राज्यात काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत अशोक चव्हाण राजीनामा देणार का? अशा चर्चा आहेत. तर अशोक चव्हाण स्वत: प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.हायकमांडकडे अशोक चव्हाण स्वत:च राजीनामा सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रताप पाटील 30 ते 35 हजारांनी जिंकले आहेत. वंचित आघाडीचा फटका अशोक चव्हाण यांना बसला असल्याची चर्चा…
Read More...

ईशान्य मुंबईच्या लढतीत भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली

मुंबईतील लक्षवेधी ठरलेल्या ईशान्य मुंबईच्या लढतीत अखेर भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली आहे. कोटक दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत.ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्याकरता शिवसेनेनं विरोध केला होता. त्यानंतर भाजपनं मुंबईचे पालिका गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. दरम्यान, मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आव्हान दिलं होतं.महत्त्वाच्या बातम्या –महाराष्ट्रातील ‘हे’ प्रतिष्ठित उमेदवार आघाडीवर…
Read More...

लाव रे फटाके….वाजव रे ढोल….भाजपकडून राज ठाकरेंची खिल्ली

लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप-शिवसेनेची मते कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवायला भाजपने सुरुवात केली असून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लाव रे फटाके...वाजव रे ढोल...अशी पोस्टर मुंबईत लावली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाषणाच्या दरम्यान राज ठाकरे 'लाव रे तो व्हिडिओ...' म्हणून मोदींच्या विरोधातल्या चित्रफिती दाखवत असत. त्याच धर्तीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईत काही ठिकाणी 'लाव रे फटाके....वाजव रे ढोल...' अशी पोस्टर लावली आहेत.…
Read More...

‘भारत पुन्हा जिंकला’, मोदींची ऐतिहासिक विजयावर पहिली प्रतिक्रिया!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळवला. सर्व विरोधक एकत्र आले असताना देखील मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे.2014च्या यशानंतर मोदींनी 12च्या सुमारास ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मोदी यावेळी काय बोलतात यासाठी सर्वजण त्यांच्या ट्विटवर नजर ठेवून होते. अखेर मोदींनी दुपारी 3च्या सुमारास ट्विटकरुन प्रतिक्रिया दिली.https://twitter.com/narendramodi/status/1131488026247323648महत्त्वाच्या बातम्या –महाराष्ट्रातील…
Read More...