तृणमूल काँग्रेसची खासदार-अभिनेत्री नुसरत जहां प्रेग्नंट? नवऱ्याला थांगपत्ता नाही!

कोलकाता : तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. याबद्दल अद्यापही कोणी माहिती दिलेली नाही. मात्र, बंगाल’च्या रिपोर्टनुसार नुसरत 6 महिन्यांची गर्भवती आहे. धक्कादायक म्हणजे पती निखिलला याविषयी काहीच थांगपत्ता नसल्याचंही बोललं जातं.

19 जून 2019 रोजी नुसरत आणि निखिल विवाहबंधनात अडकले होते. अवघ्या दीड वर्षांतर दोघांच्या नात्यात दरी आल्याचं बोललं जातं. नुसरत आणि निखिल यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची माहिती आहे. निखिल आणि नुसरत यांचा विवाह तुटण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे. दोघंही सहा महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत.

दुसरीकडे, नुसरत आणि भाजप नेते यश दासगुप्ता रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. दोघांनीही या चर्चांवर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा