काँग्रेस नाहीतर आम्ही मुख्य विरोधी पक्ष आहोत, असं दाखवण्याचा तृणमूलचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न 2019 मध्येही झाले. मात्र, लोकांनी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. आताही 2024 मध्ये असेच होणार असून पंतप्रधान मोदी यांचा विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काँग्रेसशिवाय आघाडी तयार करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार यांची त्यांना साथ आहे. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून विरोधी पक्षांमध्येच सध्या अंतर्गत सामना सुरू आहे.

तसेच त्यांच्यातील सामना संपल्यानंतर आमच्याशी कोण लढेल हे पाहू अशी टिप्पणीही फडणवीस यांनी केली. तसेच काँग्रेसला बाजू ठेवून ममता बॅनर्जी सत्तेची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहे. शरद पवार यांची त्यांना साथ असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. गोवा, ईशान्य भारतात तृणमूल काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस नाहीतर आम्ही मुख्यच विरोधी पक्ष आहोत असं दाखवण्याचा तृणमूलचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा