Triphala | त्रिफळाचा ‘या’ पद्धतीने वापर केल्याने त्वचेला मिळू शकतात अनेक फायदे

Triphala | टीम महाराष्ट्र देशा: त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्रिफळामध्ये आढळणारे गुणधर्म शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर त्रिफळामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेशी (Skin Care) संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करतात. त्रिफळामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडेंट, अंटी फंगल इत्यादी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर त्रिफळाचा खालील पद्धतीने वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

त्रिफळा पेस्ट (Triphala paste-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये त्रिफळा चूर्ण घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला साधारण दोन ते तीन मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. दिवसातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा निरोगी राहू शकते.

त्रिफळा फेस पॅक (Triphala Face Pack-For Skin Care)

त्रिफळा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा त्रिफळा पावडरमध्ये कडुलिंब, मध आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण 30 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने स्वच्छ धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहू शकते.

त्रिफळा आणि तेल (Triphala and oil-For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलामध्ये दोन चमचे त्रिफळा चूर्ण मिसळून ते चेहऱ्यावर लावू शकतात. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेला खूप फायदे मिळू शकतात.

त्रिफळा चूर्णचा वापर केल्याने त्वचेच्या खालील समस्या दूर होऊ शकतात (Using Triphala Churna can cure skin problems)

  • चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग इत्यादी समस्या सहज दूर होतात.
  •  त्रिफळा चूर्णचा वापर केल्याने पिगमेंटेशन आणि मुरुमांची समस्या नष्ट होते.
  • त्वचेवरील घाण, हानिकारक जिवाणू, बॅक्टेरिया इत्यादी गोष्टी साफ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण उपयुक्त ठरू शकते.
  • त्वचेला स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी त्रिफळा चूर्णचा वापर केला जाऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या