Triphala Churna | रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Triphala Churna | टीम महाराष्ट्र देशा: त्रिफळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. प्राचीन काळापासून त्रिफळाचा वापर अनेक रोगांवर उपचार म्हणून केला जातो. त्रिफळाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्रिफळामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम ते 1 ग्रॅम त्रिफळा चूर्णचे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत सेवन करावे लागेल. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पोट निरोगी राहते (Stomach remains healthy-Triphala Churna Benefits)

पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा चूर्ण उपयुक्त ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने तुम्ही बद्धकोष्टता, ऍसिडिटी, गॅस, पोट फुगणे, पोटदुखी इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने पचनशक्ती निरोगी राहते. पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन करू शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Triphala Churna Benefits)

शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्ण फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी पर्याय शोधत असाल, तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन करू शकतात.

तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial for oral health-Triphala Churna Benefits)

त्रिफळा चूर्णचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने तोंड आणि दात निरोगी राहू शकतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने हिरड्यांची सूज कमी होऊ शकते.

सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर रोज सकाळी नाश्त्यांमध्ये दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Curd Benefits)

दररोज नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्याचबरोबर दह्याचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Curd Benefits)

दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. दह्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता, जुलाब, पोट दुखी यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर दह्याचे दररोज सकाळी सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर होऊ शकतात. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी त्यांच्या नाष्ट्यामध्ये दह्याचा समावेश केला पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या