InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तिहेरी तलाक पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल

- Advertisement -

तिहेरी तलाक कायदा  संमत झाल्यानंतर देशातील पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल करण्यात आला आहे. पतीने व्हाट्सअप वरून तीन तलाक दिल्याची तक्रार एका उच्चशिक्षित महिलेने दिली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून तिची सासू, सासरा आणि नवऱ्याविरोधात मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम 4 सोबत, भादंवि 498 अ, 406, 34 अंतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.तक्रारदार महिलेने एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून तिला सहा महिन्यांचा मुलगा आहे. पतीसोबत सासू आणि नणंद यांच्याविरोधातही तिने तक्रार केली आहे.तिहेरी तलाक कायद्यानुसार तीन वर्ष शिक्षेची तरतूद आहे. आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.