InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बोदड येथे ट्रक घुसला घरात; गावकऱ्यांचा रास्ता रोको

- Advertisement -

वर्धा ते पुलगाव दरम्यान मलकापूर बोदड येथे अचानक कार आल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अचानक समोरून आलेल्या कारला वाचवितांना ट्रकचे नियंत्रण सुटले. भरधाव ट्रक सिमेंट पोलनतोडुन रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात जाऊन घुसला. सुदैवाने कोणी नसल्याने जिवीतहानी टळली आहे. नुकसान भरपाईसाठी नागरिकांनी रस्ता रोको केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

रायपूर येथून औरंगाबादला जात असताना राज्य महामार्गावर पुलगाव जवळील मलकापूर बोदड येथे अपघात झाला. समोरून वळणावर येणाऱ्या कारला वाचवताना हा अपघात झाला. ट्रेकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने सिमेंटचे कठडे तोडत रस्त्याच्याकडेला असलेल्या टॅक्टरला आणि दुचाकीला धडक दिली. भरधाव असल्याने तीन घरांचे नुकसान झाले आहे. ट्रक घरात घुसल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. या अपघातात तीन घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रकने धडक दिल्यावर त्या भागात कोणी नसल्याने जिवीतहानी टळली.

नुकसान भरपाई भेटावी म्हणून गावातील लोकांनी एकत्र येत राज्य महामार्ग रोखून धरला. यामुळे वाहनांच्या मोठया रांगा पाहायला मिळाल्यात. तब्बल अर्धा तास रस्ता रोखून धरल्यानंतर पुलगाव पोलिसांनी मध्यस्थी केली. नुकसान भरपाई मिळवून देण्यास मदत करण्याच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको थांबवला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

- Advertisement -

विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार – सूत्रांची माहिती

जालना जिल्ह्यातील वाटूर गावात साकारणार विठ्ठलाची 51 फुटांची मूर्ती

प्रतिकूल विचारसरणी असायला पाहिजे ; रवीना टंडनचा झायराला टोला

पाकिस्तानी चाहत्यांची विराटसेनेवर टीका

प्लास्टिक बंदी विरोधातली कारवाई पुन्हा सुरु होणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.