“हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला” – प्रवीण तरडे

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सगळेजण प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पोलिसांनी आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”, अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी पोलीस चकमकीचं समर्थन केलं आहे.

डीसीपी प्रकाश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हैदराबाद पोलीस आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी तिथे नेण्यात आलं होतं. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी पहाटेची वेळ निवडण्यात आली होती. यावेळी आरोपींनी पोलिसांची बंदूक खेचून घेत फायरिंग केली. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत आरोपींना ठार केलं”.

Loading...

हैद्राबाद मधे खरी शिवशाही ..जागेवर फैसला..

Pravin Vitthal Tarde ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 5, 2019

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.