Trupti Desai | भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – तृप्ती देसाई

पुणे : पुणे महापालिकेचे माजी गटनेते आणि भाजपचे नेते गणेश बिडीकर यांच्या शिरूर मधल्या फार्महाऊसवर एका 12 वर्षी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसानी कारवाही करत आरोपीला बेड्या ठोकल्यात मात्र हा प्रकार भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर घडला मुळे प्रकार दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडचे तृप्ती देसाई यांनी केला आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊस कामाला असणाऱ्या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांच आरोपीचे नाव असुन आरोपीला शिक्रापुर पोलीसांनी अटक केली. मात्र धक्कादायक प्रकार पुण्यातील भाजपाचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीची शेती आणि फार्महाऊस असुन पीडितेला न्याय मिळुन देण्यासाठी दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप देसाईंनी केला आहे. मात्र या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण शिक्रापरू पोलिसांनी दिली आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पिडित मुलगी यांचे आईवडील वास्तव्य आणि कामासाठी आहे. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असुन पिडित मुलीचे आईवडील कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्यांच्या नात्यातील नराधमाने फार्महाऊसच्या मागच्या मजुर खोल्यांच्या मागे घेऊन जाऊन जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या घटनेनंतर शिक्रापुर पोलीसांनी नराधम आरोपीला अटक करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.