Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश नाही

Tuljabhavani Mandir | तुळजापूरला : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तुळजापूर येतील तुळजाभवानी देवीचे मंदिर (Tuljabhavani Mandir) आहे. अनेक भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. काही जणांची कुलस्वामिनी म्हणून देखील तुळजाभवानीला ओळखलं जातं. तर आज (18 मे)  मंदिर संस्थानांकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत तुळजाभवानी मंदिर परिसरात फलकबाजी देखील करण्यात आली आहे.

तुळजाभवानी मंदिरांचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर संस्थानांकडून निर्णय घेण्यात आला आहे की, अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना मंदिर प्रवेश मिळणार नाही. यामध्ये शॉर्ट पॅन्ट,स्कर्ट, शॉर्ट ड्रेस अस देखील त्या फलकावर लिहण्यात आलं आहे. तसचं भारतीय संस्कृती आणि सभ्येतेच भान राखा असं आवाहन देखील मंदिर संस्थानांकडून करण्यात आलं आहे. यामुळे आता भाविकांनी तुळजाभवानीच्या दर्शनाला जाण्याआधी ही काळजी घेणं आवश्यक आहे.

दरम्यान, 2019 मध्ये देखील एक वाद फेटला होता तो म्हणजे अनेक वर्षांपासून तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नव्हता त्यावरून राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली होती. ती अनेक वर्षांची परंपरा 2019 मध्ये महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करून मातेच्या मूळ मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेत मोडली होती.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Ii0YU7

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.