Tuljabhavani Mandir | तुळजा भवानी मंदिर प्रशासनाचा ‘ड्रेस कोड’वरुन अवघ्या काही तासांत यू टर्न!

Tuljabhavani Mandir | तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Mandir) प्रशासनाने काल ( 18 मे) वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय घेतला होता. तर काल दुपारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली होती. परंतु अवघ्या काही तासातच हा निर्णय माघारी घेण्यात आला आहे.

काल मंदिर परिसरात देखील या निर्णयाबाबत फलकबाजी करण्यात आल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावरून वाद निर्माण झाल्याने मंदिर प्रशासाने अवघ्या काही तासांमध्ये आपली भूमिका बदलली असल्याचं सांगितलं जातं आहे. काल सायंकाळी मंदिर प्रशासन आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांची या निर्णयाबाबत बैठक झाली. त्यानंतर याबाबतचे जाहीर प्रकटन काढण्यात आलं त्यामध्ये असं म्हटलं आहे की, मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक तसंच भक्तांना कळवण्यात येते की, श्री तुळजा भवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी. अशा प्रकारे निर्णय माघारी घेण्यात आला .

दरम्यान, जो मंदिर प्रशासनने निर्णय घेतला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की, अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसचं हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी फलकबाजी मंदिर परिसरात करण्यात आली होती. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा. तर मीडिया रिपोर्टनुसार काही हाफ पॅन्ट असणाऱ्या मुलांना देखील दुपारपासून दरवाजातून आत प्रवेश दिला नाही. यामुळे या निर्णयाबाबत वाद निर्माण झाला असल्याने निर्णय माघारी घेण्यात आला असल्याचं सांगितलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45ih9ej

You might also like

Comments are closed.