Tulsi Vivah 2022 | आज पासून सुरू होत आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त, जाणून घ्या शुभ मुहूर्त

टीम महाराष्ट्र देशा: कार्तिक शुद्ध द्वादशीनंतर घरोघरी तुळशी विवाह (Tulsi Vivah) ची चाहूल लागते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहचा शुभ मुहूर्त असतो. या कालावधीमध्ये एखाद्या विवाहसमारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीच्या विवाह समारंभ पार पडला जातो. या दिवशी माता तुळशी आणि भगवान शालिग्रामचा विवाह लावला जातो.

तुळशी विवाह (Tulsi Vivah) मुहूर्त 2022

हिंदू पंचांगानुसार, आजपासून म्हणजेच कार्तिक द्वादशी पासून तुळशी विवाह मुहूर्ताला सुरुवात होत आहे. यावर्षी 8 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करता येऊ शकतो. 8 नंबर ला संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटापर्यंत तुळशीचा मुहूर्त असणार आहे.

तुळशी विवाह विधी

तुलसी विवाहासाठी सर्वप्रथम पाटावर आसान टाकून त्यावर तुळशी माता आणि शालिग्राम भगवानच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्या आसाना वरती कलश आणि पानांचा मंडप बसून सजावट करावी. ते झाल्यानंतर कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. त्यानंतर माता तुळशी आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुल इत्यादी गोष्टी अर्पण करून त्यांची पूजा करावी. त्यानंतर तुळशी मातेला शृंगार करून लाल ओढणी अर्पण करावी. त्यानंतर तुळशी मंगलाष्टक पठण करून भगवान शालिग्राम आणि माता तुळशीची आरती करावी. भगवान शालिग्राम आणि माता तुळशीचा विवाह व्यवस्थित संपन्न झाल्यावर सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे.

तुळशी विवाहाचे महत्व

वैवाहिक जीवनात अधिक गोडवा वाढवण्यासाठी आणि वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी तुळशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, जर एखाद्याच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा लग्नामध्ये गोडवा नसेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही मनोभावे देवाची आराधना केल्यास तुमच्या आयुष्यातील या समस्या दूर होतील.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.