Tushar Bhosale | संजय राऊत हिंदूची औलाद नाही; तुषार भोसले यांचा संजय राऊतांवर घणाघात

Tushar Bhosale | नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तुषार भोसले यांनी संजय राऊतांवर घणाघात केला आहे.

नक्की काय म्हणाले संजय राऊत? (What exactly did Sanjay Raut say?)

त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “उरूसमध्ये धूप दाखवण्याची परंपरा 100 वर्ष जुनी आहे. मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना धूप दाखवून पुढे त्यांच्या मार्गाने जातात. ही त्यांची खूप जुनी परंपरा आहे.”

तुषार भोसलेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र (Tushar Bhosle criticism to Sanjay Raut)

संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देत तुषार भोसले म्हणाले, “त्र्यंबकेश्वरमधील सगळे पुरोहित, विश्वस्त, पुजारी आणि मंदिराचे व्यवस्थापन हे सगळे मिळून म्हणत आहे की असली कुठलीही परंपरा इथे नाही. तरीही संजय राऊत म्हणतात ही शंभर वर्षे जुनी परंपरा आहे. याचा अर्थ असा की संजय राऊत हिंदूंची औलाद नाही. ते जर हिंदूचे औलाद असतील तर त्यांनी सिद्ध करावं की, ही शंभर वर्षे जुनी परंपरा आहे.” संजय राऊत यांनी याबाबत 24 तासांत माफी मागावी. नाहीतर याचे गंभीर परिणाम उद्धव ठाकरेंना भेगावे लागणार आहे, असा इशारा देखील तुषार भोसले यांनी दिला आहे.

नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल (Nitesh Rane attacks Sanjay Raut)

या सगळ्या प्रकरणावरून नितेश राणे यांनी देखील संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. राणे म्हणाले, “संजय राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते आणि आधुनिक जिन्ना जिहादी विचारांच्या मुस्लिमांना पाठिंबा देत आहे. संजय राऊत आजकाल मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहे.” आम्हाला चादर घालायची असा हट्ट धरून त्या लोकांनी मंदिरात प्रवेश केला होता, हे कदाचित मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याला (संजय राऊत) समजलं नसेल, अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pRxW7G