InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘माकड आणि टोपीवाला’ या गोष्टीवरून संजय राऊत आणि सचिन सावंत यांच्यात ट्विटरवॉर

- Advertisement -

माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यात चांगलेच ट्विटरवॉर झाल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी माकडं आणि टोपीवाल्याच्या गोष्टीचा संदर्भ देत अप्रत्यक्षरित्या काँग्रेसची खिल्ली उडवली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत

टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकून दिली. याचा काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याशी काही संबंध नसल्याचे म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधी आणि अन्य नेत्यांच्या सुरू असलेल्या राजीनाम्यावर टीका केली.

- Advertisement -

संजय राऊतांच्या या टिकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टोपीवाला आणि माकड याच गोष्टीचा संदर्भ देत शिवसेनेवर निशाणा साधला. टोपीवाला टोपी खाली टाकीन असे म्हणत राहीला पण टाकेचना! सगळी माकडं आपल्या जवळच्या टोप्या पकडून राहिली. टोप्या टाकायला तयारच होईना! याचा शिवसेना मंत्र्यांच्या खिश्याबाहेर न येणाऱ्या राजीनाम्यांशी काही संबंध नसल्याचे म्हणत सचिन सांवत यांनी संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.