टूलकिट प्रकरणी भाजपच्या संदेशावर ‘ट्विटर’ची कारवाई

काँग्रेसने बनवलेल्या कथित ‘टूलकिट’प्रकरणी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा संदेश दिशाभूल करणारा आहे, तो फेरफार करून तयार केला आहे, असे स्पष्टीकरण देत ‘ट्विटर’ने त्यातील दृश्ये, ध्वनीमुद्रण, छायाचित्रे यांचा समावेश ‘फेरफार’ या गटात केला आहे.

केंद्राच्या कोरोना परिस्थिती हाताळण्याबाबत काँग्रेसने तयार केलेल्या कथित ‘टूलकिट’वर आक्षेप घेणारा भाजपचा संदेश ‘फेरफार’ प्रकारात टाकण्याच्या ‘ट्विटर’च्या निर्णयाला केंद्र सरकारने ‘पूर्वग्रहदूषित आणि मनमानी’ ठरवून त्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे.

भाजपने ‘ट्विटर’ला अधिकृत उत्तर देण्याआधीच नेत्यांनीही ट्वीटरवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. आता केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही ‘ट्विटर’ला पक्षपाती ठरवले आहे.

दरम्यान, ‘ट्विटर’च्या ‘फेरफार’ शेऱ्यामुळे भाजपचे कथित ‘टूलकिट’बाबतचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा