अडीच वर्षे झाली आता अजितदादांना मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नाही : चित्रा वाघ

मुंबई : महापालिकेतील निसटलेली सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी अजित पवार यांनी आता स्वत:च कंबर कसली आहे. निवडून येईल वा निवडून आणतील अशांना पक्षात घेण्याचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या.

कोल्हे म्हणाले होते कि, शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर यावर आता भाजपच्या महिला प्रेदशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मोठं वक्तव्य केलय.

वाघ म्हणाल्या कि, अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. असं माझ्या ऐकण्यात आलं. अडीच वर्ष शिवसेनेला आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याचं मी मध्यंतरी ऐकलं होतं. परंतु ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे. तरीही राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला काहीच हरकत नाही, असं माझ्या सारख्या कार्यकर्तीला वाटत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा