InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कोपरी खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडुन मृत्यू

ठाणे पुर्व येथील कोपरी खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभम देवकर (वय 15) व प्रवीण कांचरी (वय 15) असे मृत मुलांची नावे आहेत. कोपरी कोळीवाडा येथे ते राहत होते.

कोपरीतील के.सी. इंजिनिअरिंग कॉलेज येथे दोघांचे मृतदेह सापडले. शनिवारी दोघही पोहण्यासाठी कोपरी खाडीत गेले होते. रात्रीपासून दोघे घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. अग्निशमन दल, महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कोपरी पोलीस घटस्थळी दाखल झाले. यानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply