InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कांचनजुंगा शिखर सर करताना दोन भारतीय गिर्यारोहकांनी गमवला जीव

जगातील तिसरे सर्वात उंच शिखर असलेल्या कांजनजुंगाने गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान दिले आहे. हेच शिखर सर करताना गुरुवारी दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.  विप्लव वैद्य (48) आणि (46) वर्षीय कुंतल कनरार अशी मृतांची नावे आहेत. समुद्रसपाटीपासून अंदाजे 8 हजार मीटर उंचीवर असताना गुरुवारी पहाटे ही घटना घडली.

वैद्य यांनी बुधवारी कांचनजुंगावर 8,586 मीटर उंची सर केली होती. परंतु परतीच्या वाटेत अल्टिट्यूड सीकनेसमुळे त्यांचा मृत्यू झाला. तर करनार यांचा शिखर सर करण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. मृत दोघेही कोलकात्याचे रहिवासी होते. असे गिर्यारोहक दलातील पासंग शेर्पा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.