InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे दोन कोटींचे अनुदान रखडले…

मागील वर्षी कवडीमोल भावाने विकलेल्या कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या दोन हजार 198 शेतकऱ्यांचे दोन कोटी चार लाख 61 हजार 656 रुपयांचे अनुदान रखडले आहे. मागील वर्षी कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला होता. कांदा उत्पादनाचा खर्च तर निघालाच नाही. बारदान्याचा खर्चही अंगलट आला होता.

कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान दोनशे क्विंटलपर्यंत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या कालावधीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान 15 मे 19 रोजी मंजूर झाले आहे. एक नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले आहे.

Loading...

परंतु 16 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या दोन हजार 198 शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे संबंधित कांदा उत्पादक या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. यावर्षी कांद्याला चांगला भाव असला तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परतीच्या पावसाने कांदा शेतात सडल्याने शेतकऱ्यांचे या वर्षीदेखील नुकसानच झाले आहे

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.