InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पुणे-मुंबई हायवेवर दोन भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दहा जखमी

- Advertisement -

सध्या हाय वे वरील अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत चालले असून पुन्हा एक भीषण अपघात पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर घडला.

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वर बुधवारी दोन वेगवेगळे अपघात झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

पहिला अपघात कामशेत सडवली गावच्या हद्दीत झाला. मुंबई वरून पुण्याला येताना पीक अप गाडी डिवाडयडरला धडकली. यात चालकाचा मृत्यू झाला तर क्लिनर जखमी झाला.

दुसरा अपघात तेलंगण महामंडळाची एसटी बस तेलंगणावरून मुंबईला बोरवलीला जाताना ओझर्ड गावाच्या हद्दीत झाला. बसने अज्ञात वाहनाला धडक दिली.

या अपघातात बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. चौघांची प्रकृती गंभीर तर पाच किरकोळ जखमी आहेत. सर्वांना सोमटणे फाट्याच्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तळेगांव दाभाडे पोलील अधिक तपास करत आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.